लेक्चर
( थोडेसे कवितेबद्द्ल...
मी हि कविता माझ्या एका लेक्चर मध्ये बसुन लिहिली("कुठले लेक्चर?" हा प्रश्न विचारु नये)... तुम्हाला सुध्दा बर्याचदा हा अनुभव आला असेल )
वेळ संपत नाही
वाट सरत नाही..
कुठे जायचे काही भान नाही
काही भान नाही
डोळ्यांदेखत रोजच होतो अत्याचार
दिवस वाईट गेला, त्यात नवल नाही, काही नवीनही नाही..
शिकविलेले काहि कळत नही,
यातसुध्दा काही नवीन नाही
प्रेमापायी इतुके वीर झाले वेडे
Attendance प्रेमाची व्याधी काही केल्या जात नाही
आल्या Assignments झाले Projects
"Defaulter" ही माझी ओळख अजुनही पुसत नाही
"To learn, it's never late...", असं म्हणता
उशीरा वर्गात आलेल्यांची मग Attendance का लागत नाही?
ती
स्वत:ला समजावले खुप
मन मात्र अजुनही ऎकत नाही
तुझ्याशिवाय मी अन माझ्याशिवाय तु
यावर ते विश्वासच ठेवत नाही
आले उन्हाळे गेले ऊन्हाळे
ऋतु कितितरी एकटे एकटे
प्रेमाचा येणार वसंत
सागतांना थकत नाही
द्यायचे राहुनच गेले
द्यायचे राहुनच गेले, चार शब्दांचे एक पत्र
ओठ कोरडे पडलेले आणि थबथबलेले नेत्र
द्यायचे राहुनच गेले, ते क्षण तुझे माझे
अवाक्षरही नाही पण डोळ्यांचे डोळ्यांशी हीतगुज
द्यायचे राहुनच गेले, निरोपाचे दोन शब्द
गोठलेले शब्द अन तुझ्या परतीची आशा मनात
द्यायचे राहुनच गेले, ते उरलेसुरलेले प्रेम
सरले नाहीच ते कधीहि, मात्र थोडेसे आसवांबरोबर टाकले पिऊन
द्यायचे राहुनच गेले...
जे कधीही घेतले नाही
मित्रांनो गालिब चा एक शेर खास तुमच्या साठी
दिले नादां तुझे हुवा क्या हैं
आखिर इस दर्द कि दवां क्या हैं
हम को उनसे वफा की हैं उम्मीद
जो नहिं जानते वफा क्या हैं