"Children of Heaven" ही मजीद मजीदी ची अतिशय सुंदर कलाकृती आहे. मला इतर ratings बद्दल कल्पना नाही पण मी बघितलेल्या चित्रपटांमधील सुंदर चित्रपट हा आहे. (फक्त विधानाच्या पुष्टिकरीता म्हणुन सांगतो: माझा बरासचा वेळ मी कंप्यूटरच्या आणि सिनेमाच्या पडद्यासमोरच घालवतो.) एका बहिण-भावाच्या छोट्याश्या जगात घडणारी ही कथा. हयात कुठे romance नाही, संघर्ष नाही, मारामारी नाही किंवा "सुंदर गाणी अणि तूफ़ान हाणामारी" सुद्धा नाही. तरीही हा चित्रपट तुम्हाला आवडतो कारण सहज सोप्पी आणि सुंदर कथा व कलाकारांचा जिवंत अभिनय. Amir Farrokh Hashemian(अली) आणि Bahare Seddiqi(झाहरा) या बालकलाकारानीं आपल्या अभिनयाने चित्रपटात जीव ओतलाय, नक्कीच तेवढेच श्रेय मजीद मजीदीचे देखिल आहे।
एक दिवस अली कडून झाहरा चे shoes हरवतात. खुप प्रयत्न करूनही ते काही सापडत नाहीत. वडील एवढे गरीब की आजारी बायकोच्या च्या उपचारासाठी ते कसबसे पैसे देतायत, shoes साठी पैसे कुठून देणार? अली झाहरा ला आई वडीलाना काही न सांगण्याची गळ घालतो... पण shoes चे काय? मग अली चे shoes दोघांनीही वापरायचे असे ठरते. आणि त्यांच्या समोर वेगवेगळ्या अडचणी उभ्या रहातात. झाहराचे अली ला उशीर होऊ नये म्हणुन शाळेतुन शक्य तितक्या लवकर पळत पळत अली कडे येणे. यातुनाही अली ला उशीर होउन शिक्षकांचे अलीला रागावाने. शिक्षकांची मुलांच्या अडचणी हताळण्याची कोडगी पद्धत सगळेच कसे अगदी आपल्या-कडील परिस्थितीशी मिळते-जुळते. या सगल्या अडचणींतही मुलांचा निरागसपना टिकून आहे हे वारंवार जाणवते. ह्या सगळ्यांतुन एक उपाय शेवटी अली ला सापडतो. एका marathon मध्ये तीसरे बक्षिस असते shoes. ते जिंकुन तो झाहरा ला तिचे shoes परत देण्याचे ठरवतो. पुढचे चित्रपटातच बघण्यात मजा आहे....marathon नंतरचा प्रसंग मजीद ने आपले सगळे कौशल्य वापरून चित्रित केलाय!
अतिशय योग्य जागी दिलेले संयत संगीत ही चित्रपटातील आणखी एक जमेची बाजू. बर्याचश्या आनंदी प्रसंगामध्ये रंग भरण्याचे काम संगीतकाराने चोख पार पाडलेले आहे. चित्रपट इरानी आहे परन्तु मला तो बघताना भाषेचा अडसर अज्जिबात जाणवला नाही. हा पहिला ईरानी चित्रपट जो "Best Foreign Language Film" या ऑस्कर अवार्ड साठी nominate झाला. त्यावेळचा ऑस्कर मात्र Life Is Beautiful ला मिळाला. तो सुद्धा तितकाच सुंदर चित्रपट!
children of Heaven सुंदर आहे याबद्दल कुठलीही शंका नाही. परन्तु जर तुम्हालाही त्यात तुमचे लहानपणी प्रसंग आठवले तर मात्र तो तुम्हाला तुमचाच वाटेल. तुमचे भाऊ-बहिण, छोटी छोटी भांडणे रुसवे फुगवे. आनंदाचे काही क्षण हे सगळे. ही सिनेमा तटस्थ पणे बघुन तुम्ही याचे कौतुक करू शकता किंवा अली आणि झाहरा बरोबर वहावत जाऊन तुम्ही त्यांचा आनंद आणि दू:ख शेयर करू शकता, choice तुमची आहे.
Children of Heaven
Children of Heaven