Friday, June 27, 2008

बाबांचा अभ्यास

बाबांचा अभ्यास
बाबा लोक(म्हणजे वडील लोक... ते वाले बाबा लोक नाही) मुलांचा अभ्यास कसा घेतात?
----
"ग्रहणं म्हणजे काय बाबा?", मी म्हणालो; "ग्रहण म्हणजे... ह्म्म्म ग्रहण म्हणजे...", बाबा थोड़े विचारात पडल्यासारखे दिसले. "अरे ग्रहण म्हणजे तोंडाला काळे फासने! हूँ. परवाच में एक अग्रलेख लिहिलाय 'कांग्रेस च्या लोकप्रियतेला ग्रहण." "पण हे ग्रहण कसं होतं?". "कसं होतं म्हणजे? एवढं नाही माहिती? कमाल आहे बाबा...", बाबा खेकसलेच. मी फ़क्त मान डोलावली. तेवढ्यात स्वयंपाकघरातून चर्रर्र असा आवाज आला. बाबानी नाक वर ओढलं, "मध्या, आईने पीठलं केलय का रे आज?". मीही नाक वर करून जोरात वास घेतला. फुर्र करून "विचारून घेऊ का आईला?". "नको,नको नको विचारू नकोस." बाबा घाई घाईने म्हणाले. "उगीच आपली चौकशी केली रे...बाकि... हे... पीठलं असलं तर बरं होइल म्हणा." "तुम्हाला खुप आवडत पीठलं बाबा?" मी विचारले. "खुप" . "मला पण आवडतं!"-मी. "छान छान", बाबानांही समाधान वाटल्यासारखे दिसले. मग मी हळूच पुढे सरकलो, टेबलाजवळ गेलो. "मी थोड़े दाणे घेऊ का बाबा, यातले थोड़े?" "हाँ घे, पण थोड़े घे थोड़े मला ठेव." बशीत हात घालून मी शेंगादाणे उचलले आणि तोंडात टाकले. बाबांनीही थोड़े तोंडात टाकले. आम्ही दोघेही थोडावेळ तोंड हालवत गप्प बसून राहिलो. तोंड रिकामं झाल्यावर मग मी म्हंटले "सांगाना बाबा मग, हे ग्रहण कसं होतं?"... "वर्गात नाही का सांगितल तुला गुरुजींनी?" "शान्गितलं, पण नीट कळलं नाही मला.". "ह्याट च्या, तू तर असा रड्या आहेस, मध्या.". "पण सांगा नं", मी हट्ट्च धरला." "अरे ग्रहण sss", असं म्हणुन बाबांनी जे डोळे मिटले बराच वेळ ते उघडलेच नाहीत. मला तर वाटले बाबाना झोप लागली की काय. म्हणुन में पुन्हा त्याना हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मग त्यानी पुन्हा ते डोळे उघडले. मी पुन्हा त्याना तो प्रश्न विच्याराल्यावर मग मात्र ते ज़रा त्रासलेलेच दिसले. मला म्हणाले, "अरे म्हणजे काय गम्मत आहे माहीत आहे का? ह्या सम्बन्धी ज़रा मतभेद आहेत."... "मतभेद? म्हणजे?", मी उत्सुकतेने विचारले. "आता मतभे S द म्हणजे..." बाबानी दोन्ही हात असे इकडे तिकडे फिरवून बराच वेळ मला काहीतरी सांगितले. पण मला एक अक्षरही समजले नाही. "बरं बरं, ते जाऊ दे आता. तुला पंचांग माहीत आहे का, पंचांग? मग झालं तर. अरे पंचंगामध्ये सगळी ग्रहण दिलेली असतात." "पण हे ग्रहण होतं कसं?"-मी "आता होतं कसं? हा काय प्रश्न आहे? अरे ग्रहणं ही होणारच! पंचंगावाल्यांनी सारख्या तारखा ठरवलेल्या असतात त्यादिवशी ग्रहण बरोबर होतं". बाबांनी मग आणखी मला काही माहिती सांगितली त्यावरून मला खूउप नविन द्यान मिळालं. त्यांच्या बोलान्यवारून मला कळलं की पंचांग वाले लोक असतात ते पहिल्यांदा ग्राहनाच्या तारीख ठरवून टाकतात. ते म्हणाले की अमुक अमुक दिवशी सूर्यग्रहणं बुवा, की सूर्य येतो आणि ग्रहण करून निघून जातो, सोप्प! त्यानीं चंद्रग्रहण म्हंटल की चंद्र येतो आणि ग्रहण करून निघून जातो. त्यात कद्ध्ही चुक होतं नाही. त्या दिवशी बरोबर सुर्याच्या अंगावर काळे पट्टे दिसतात. लोक इकडे "दे दान सुते गिर्हान", असे म्हनू लागले की तिकडे ग्रहण खलास. पूर्वी राहू केतु त्यानां गिल्तात अशी समजूत होती. पण आता नविन द्यानामुळे ते खोट ठरले. आता पंचांग वालेच त्याना गिळतात असं सिद्ध झालेल आहे. एवढी माहिती सांगितल्यावर बाबा घाई घाईत म्हणाले, "हम्म पुरे आता पूरे, समजल ना? ती फेकून दिलेली पुस्तके इकडे आण." मी आश्चर्याने म्हणालो, "आता काय करायच पुस्तक बाबा? मला समजल छान. आणि पुस्तकात काहीतरी भलतच दिलय बाबा." "अस बघू बघू तर काय दिलय ते?" मी पुस्तक उचलून बाबांजवळ दिले, बाबांनी त्यातली पानं चाळली. पुन्हा काहीतरी वाचाल. ज़रा त्यांचा चेहरा पुन्हा ज़रा उतरला अस मला वाटल. मी काही विच्यारायच्या आताच ते म्हणाले, "मध्या, ही सगळी माहिती तुला अत्ता सांगितली ती तुला लक्ष्यात राहिली?" "होsss." "मग सांग बघू." मी थोडसं काहीतरी सांगितल पण थोडसं काय काय आठवेना, आजिबात काही आठवेना. आत्ता बाबा रागावनार अशी मला भीती वाटली. पण त्यांचा चेहरा ज़रा हसतमुख झाला. "हा हा, विसरलास ना? काय हट लेका तुझी. जाउदे. आता मी पुस्ताकातलाच वाचून दाखवतो थोड निराळं आहे पण तेच लक्ष्यात ठेव." एवढं सांगुन बाबा मला पुस्तकातला धडा वाचून दाखवू लागले. बशितल्या दाण्याकडे लक्ष्य ठेवत मी ते ऐकत राहिलो...
-----
द. मा. मिरासदारांची कथा "बाबांचा अभ्यास" चा हा काही भाग. मला खुप आवडली. आमच्या बाबानां हां आनंद आम्ही फारसा देउच शकलो नाही. हॉस्टल ला आलो आणि ती जबाबदारी रेक्टर वर आली. त्यानिही ती छड़ी अणि शिस्ती ने इमाने इतबारे पार पाडली(आणि आमची मस्तच लागली.) असो. मिरासदारांच्या तक्रार, आमंत्रण ह्या कथाही वाचन्या सारख्या आहेत. बर्याचश्या "मिरासदारी" मध्ये आहेत.
द मा मिरासदार ग्रामीण बाजाच्या कथा छान लिहित. तितक्याच खुमासदार ग्रामीण कथा लिहिणारे दुसरे लेखक शंकर पाटिल. त्यांच्या कथांबद्दल नंतर कधी तरी.

No comments: