Monday, March 22, 2010

LSD

LSD is an hallucinogenic drug that acts on the serotonin receptor. Which can include altered thinking processes, closed and open eye visuals, synaesthesia, a sense of time distortion, ego death and spiritual experiences, This is what wikipedia says about LSD.

LSD बघितल्यानंतर प्रेक्षकांवर असा काही effect होणे दिबाकर बनर्जी ला अपेक्षित आहे कि नाही देव आणि दिबाकर जाने, पण प्रत्येक प्रेक्षकावर काही न काही effect होईल हे मात्र नक्की.
LSD चा विषय ( it 's Love, Sex and धोखा) आणि त्याही पलीकडे बदलती lifestyle हे नव्या भारतीय समाजातील कळीचे मुद्दे. आत्ता तुम्ही अश्या विषयांवर सिनेमा काढून एकतर लोकप्रबोधन करू शकता (उदा. MNIK - केविलवाणा प्रयत्न) किंवा सत्य परिस्थिती दाखवून बोध देण्याचा प्रयत्न करू शकता (उदा स्वदेस ). LSD ने निवडलेला मार्ग निराळा आहे, तो तुम्हाला त्याच्या कथे मार्फत परिस्थिती सांगतो, त्यातून काय घ्यायचे हे मात्र तुमच्या वर सोडतो.

आपल्या कडे अश्या सिनेमांची allergy आहे. आम्हाला तुम्ही logical end वर पोहचवले नाही तर आम्ही डिरेक्टर ला शिव्या टाकतो, (मिथ्या बकवास movie रे! काहीही काढतात). अश्या काही reactions LSD ला सुद्धा मिळण्याची शक्यता आहे पण worry not , हिंदी सिनेमा ला आणि पर्यायाने प्रेक्षकांना बरे दिवस येतायत त्यामुळे मिथ्या LSD हे सिनेमे सुद्धा चालतील.

१९९९ ला The Blair Witch Project नवाचा एक सिनेमा hollywood मध्ये रिलीज झाला होता.
हि ३ तरुण filmakers ची कथा आहे. हे तिघेजन Burkittsville, Maryland जवळ "Black हिल्स" मध्ये एका रहस्यमय लोककथेवर आधारित documentry बनवण्यासाठी साठी म्हणून जातात आणि कधीच परत येत नाहीत परंतु त्यांच्या video आणि audio recordings एक वर्षानंतर सापडतात. हा सिनेमा म्हणजे त्या recordings !

हा सिनेमा आठवण्याचे कारण म्हणजे LSD ... LSD बनवताना दिबाकर बनर्जी च्या मनात कुठेतरी The Blair Witch Project ची concept नक्की असावी. Handy -Cam हे The Blair Witch Project मधील एक पात्र आहे तर LSD मध्ये तो एक observer आहे. observer / handy cameras वापरून शूटिंग करण्यामागे आणि अनोळखी चेहरे घेण्यामाग दिबाकर बनर्जीचे logic साधे सोप्पे आहे. सिनेमा life style बद्दल आहे आणि तो अधिक अधिक live वाटला पाहिजे. डिरेक्टर तुम्हाला स्टोरी सांगतोय असे वाटण्यापेक्षा तुम्ही त्या घटना स्वतः बघताय हि फिलिंग प्रेक्षकांना देणे ... हा त्याचा उद्देश आहे आणि तो बर्यापैकी सफल झालाय.


तीन वेगवेगळ्या कथा एकत्र गुंफणे सुद्धा छान जमलेय (युवा नंतर हे एक यशस्वी उदाहरण).
मी स्टोरी बद्दल जास्त बोलणार नाही ... कारण मला आता झोप येतेय !
परंतु bollywood मधील एक नवीन आणि छानपैकी जमलेला प्रयोग बघणार असाल तर LSD चुकवू नका !

1 comment:

Chheda said...

LSD: A fantastic concept implemented perfectly without losing any grip.

A movie without any logical end leaves its on impression and make one think about it ... so is this.

I must say "A must watch"