Wednesday, April 30, 2008
गुलजारची गाणी : कल्पनेच्या भरा-यांकडून वास्तवतेच्या पाय-यापर्यंत
'मुझको कोई अपना दे जा
मुझको कोई सपना दे जा
हल्का फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी...
''सदमा' सिनेमातल्या गाण्यातल्या या ओळी। एखादं मोरपीस गालावरून फिरावं इतक्या हळुवारपणे हे शब्द आपल्या मनाला मोहरून टाकतात. गुलजारच्या अशा मुलायम शब्दांबाबत बोलण्यासाठीही आपल्याकडेच शब्द शिल्लक राहत नाहीत.
गुलजार म्हटलं की कानात अनेक गाणी रूंजी घालू लागतात। एरवी फिल्मी गाणी आपल्याला पटकन आठवत नाही. पण 'थोडीसी बेवफाई'मधलं राजेश खन्नावर चित्रित झालेलं 'हजार राहे मूड के देखी, कही पे कोई सदा न आई...' हे गाणं एकदा रेडिओवर ऐकलं आणि प्रश्न पडला... इतक्या वर्षांनंतरही इतकं ताजं का वाटतं? काही उलगडाच होईना. मग कधीतरी या गाण्याचे गीतकार गुलजार असल्याचं ऐकलं आणि या ताजेपणाचं रहस्य लक्षात आलं. गाणं कधीही जुनं वाटणार नाही, असे हुकमी शब्द वापरण्याचं सामर्थ्य गुलजारकडे आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर 'आंखे भी कमाल करती है पर्सनल से सवाल करती है...'असं गुलजार सहज लिहून जातो. त्यातला 'पर्सनल से सवाल' आपल्याला खटकतही नाही. आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत अशा अनेक शब्दांचा वापर सहज करत असतो. त्यामुळेच अशी रचना शब्दही आपल्याला परकी न वाटता आपलीच वाटू लागते.
हिंदी सिनेमातल्या गीतकारांच्या गर्दीत गुलजार नेहमीच वेगळा वाटतो। त्याच्या गाण्यातले शब्द, प्रतिमा, उपमा कधीही परग्रहावरच्या वाटल्या नाही. प्रत्यक्षात त्याच्या गाण्यातल्या अनेक प्रतिमा या खरं तर आपल्या कल्पनेपलीकडच्या...आवाक्यापलीकडच्या. पण त्या इतक्या सहजतेने वापरलेल्या असतात की आपण नकळत हळवं होऊन जातो. 'एकसो सोला चांद की राते...' असं म्हणत गुलजार उपमांच्या आकाशात नेतो आणि मग अचानकपणे त्याच्या पुढच्या 'और तुम्हारे कांधे का तील' या शब्दांतून तो आपल्याला उपमांच्या आकाशातून अलगद जमिनीवर आणून सोडतो. वास्तव आणि कल्पनेच्या जगात गुलजार अतिशय सहजतेने वावरतो. पण आपण मात्र कधी त्याच्या वास्तवात जमिनीवर वावरतो, तर कधी त्याच्या रोमँटिझम'च्या आकाशात फिरू लागतो... अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला गुंतवून ठेवण्याची, बंदिस्त करण्याची ताकद केवळ गुलजारमध्येच आहे.
सिनेमासाठी गाणी लिहणारा म्हटलं की तो शायर राहत नाही। हव्या त्या चालीवर शब्द बांधून देणारा गीतकार ठरतो. जेव्हा सिनेमाला चांगली पटकथा, मेलोडिअस संगीत असायचं, अशा वेळी गुलजारच्या शब्दाला वेगळीच चमक यायची. 'आंधी'मधलं 'इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते...' किंवा 'मौसम'मधलं 'दिल ढुंढता है फिर वोही, फुरसत के रात दिन...' ऐकताना हे फिल्मी गीत आहे, असं म्हणण्याचा कोणी मूर्खपणा करणार नाही.
सिनेमात रूळलेली माणसं सिनेमाशिवाय कशाचा विचार करत नाही। त्यांच्या माणूस म्हणून सिनेमाखेरीज कोणत्याच संवदेना शिल्लक राहत नाहीत. पण गुलजार कवी म्हणून संवेदनशील आहे, तसाच तो पटकथा लेखक, संवादलेखक म्हणूनही आहे. 'साथिया' सिनेमातल्या एका गाण्यात, 'दोस्तो से झुठीमुठी दुसरो का नाम लेके तेरी मेरी बाते करना' किंवा 'सत्या' सिनेमात 'सारा दिन रस्ते पे खाली रिक्षेसा पिछेपिछे चलता है' इतकं वास्तववादी लिहतो. पण याच सिनेमातल्या 'बादलों से काट काट के कागजो पे नाम जोडना' असं लिहून गुलजार एकदम स्वप्नाळू उपमा देऊन जातो. किंवा अनेकदा आपण कधी त्यांनी वापरलेल्या उपमांनी थक्क होतो. तरी 'गीला पानी', 'कांच के खाब', 'कोहनी के बल पे चलता चांद' अशा उपमा सहजपणे त्याच्या फिल्मी गाण्यात येऊन जातात.
'दिलसे रे' गाणं ए। आर. रहमान आणि शाहरूख खानचं. या दोघांच्या तरुणाईत गुलजारचे शब्दही तितक्याच ताकदीने तरुण झाले होते. 'चल, छय्या छय्या' म्हणताना आपण नकळत कधी ताल धरतो ते कळत नाही. पण 'ऐ अजनबी, तू भी कभी आवाज दे कहीं से...' म्हणताना त्यातला शायर अजूनही कायम आहे, हे सांगून जातो. 'घर' या सिनेमासाठी गुलजारने एकाहून एक सरस गाणी लिहिली. 'कांच के खाब है, आंखो में चुभ जायेंगे', असं लिहणारा गुलजार 'बोतल से एक रात चली है, खाब उडाके रात चली है', असंही म्हणतो. त्यामुळेच तो अजब रसायन असल्याची खात्री पटून जाते.
गुलजार काळाप्रमाणे, नव्या पिढीप्रमाणे बदललाय। पण त्याच्या जुन्या कवितांमधला, गाण्यांमधला फ्रेशनेस मात्र अजिबात कमी झालेला नाही. म्हणूनच तर तो आजच्या पिढीला जितका आपला वाटतो, तितकाच आधीच्या पिढ्यांनाही. मग ती पिढी ग्रामीण भागातली असो वा शहरी॥!
{ मूळ लेख बघण्यासाठी इथे click करा महाराष्ट्र टाइम्स }
Saturday, April 26, 2008
वनवास
"वनवास" हे नाव वाचल्यावर मला वाटले की हे पुस्तक थोडे गंभीर स्वरुपाचे असेल... मी बस मध्येच ते वाचायला घेतले आणि माझे मलाच आठवत नाही की पुस्तक वाचतानां मी कितीदा मोठया मोठयाने हसलो आणि ... खरे सांगायचे तर ... काही वेळा रडलो देखील...
काही कथासंग्रह विनोदी असतात तर काही गंभीर; हा मला माझा वाटला! प्रकाश नारायण संतानीं, वनवास चे लेखक, कुठलाही आव न आणता लम्पन ची कथा त्याच्याच शब्दांत कागदावर उतरवलीय. एका शाळकरी मुलाचे सुन्दर जग... त्याचे आयुष्य, ते वातावरण; वाचता-वाचता आपणही लम्पन बरोबर त्याच्या गावात पोहचतो, मग सुमीमध्ये आपल्याला आपल्या बालपणाची हरवलेली मैत्रिण सापडते, गुन्डीमठ रस्ता आपल्या गावातल्या गल्ली सारखा वाटतो आणि आईची खुप खुप आठवण येते...मन दूर भुतकाळात जुन्या दिवसांच्या गावी जाते, तुम्हाला आठवतात शाळेतल्या गमती, तुमच्या शेजारी बसणारे मित्र...तुमच्यावर रागावणारे तुमचे आज्जी आजोबा, आईच्या हातचा मार, तुम्ही लटके रागावुन घरातून रुसून गावातील मंदिरात गेले होते तो प्रसंग, मग आईने तुमची काढलेली समजूत, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सुरपारम्ब्या... आणि बरेच काही! आणि यामुळेच तुम्हाला हा कथासंग्रह तुमचा वाटतो।
हा लम्पन त्याच्या आज्जी आजोबांकडे राहतो. तो तिथेच शाळेत जातो. कर्नाटकातील कुठलेशे हे सुंदर गाव तिथे एक तळे आहे, मारुतीचे मन्दिर आहे, गावाबाहेर छान छान शेतं आहेत... लम्पन चे आजोबा अणि लम्पन ची खास मैत्री आहे ते त्याच्यावर फारसे रागावत वगैरे नाहीत... आज्जी मात्र थोsssडी म्याड आहे कारण ती कधी रागावते अणि कधी माया करते. सूमीचे आजोबा मात्र खुप खाष्ट आहेत, कारण भूगोल त्यांचा आवडता विषय आहे आणि लम्पनने एकोनिसशे सत्ताविस वेळा वाचुनही तो त्याच्या लक्षात राहत नाही. लम्पंची आई-बाबा त्याची म्याड बहिण मनी आणि बिट्ट्या त्याला कधी कधी भेटायला येतात... ते दिवस मात्र तो जपून ठेवतो।
ह्या लम्पनच्या गोष्टी "एकदा नाही दोनदा नाही अठावीसशे तीस वेळा जरी म्याड सारख्या वाचाल्या" तरी ताज्याच वाटतील. सुमीला बघितल्यावर त्याचे पाण्यात खोल गेल्यासारखे वाटने, तिने काही विचारल्यावर, आजी काचेचे भांडे जेंव्हा जपून घेउन जायला सांगते तेंव्हा सारखी पोटात गडबड होणे. सगळेच अप्रतिम आहे. त्याच्या पौगंडावस्थेतील भावविश्वाचे इतके छान चित्रण करण्यासाठी मनही तेवढेच लहान मुलाचे असावे लागते. वनवास वाचल्यावर वनवास हाही खर्या अर्थाने आनंदवासच असतो हे प्रकाश नारायण संतांचे मत तुम्हालाही पटते. हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.
( वनवास लेखक: प्रकाश नारायण संत प्रकाशन: मौज )
-nile
Thursday, April 24, 2008
निबंद - पावूस!
मला आलेल्यी एक फोरवर्ड मेल ... हा सुद्धा एक निबंधच आहे ... पावसावर
मुळ लेखाचा उगम मला नुकताचा मिळाला http://rahulphatak.blogspot.com/2007/05/blog-post_24.html
Sunday, April 20, 2008
Big Brother
आपण उगीच Hollywood च्या Matrix etc. आणि इतर साउथ इंडियन सिनेमाना नावे ठेवतो... हे लोक अतर्क्य काहीतरी दाखवतात म्हणुन... बॉलीवुड तर तयांचा पलीकडे पोहचलेले आहे ... हे बघा
Friday, April 11, 2008
निबंध :- माझा आवडता पक्षी
निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो. कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते