Friday, April 11, 2008

निबंध :- माझा आवडता पक्षी

ज्या कुणीही हा निबंध लिहिलाय ... दाद द्यावी लागेल! एकदम मस्त!

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो. कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते

5 comments:

Anonymous said...

are mitra masoli(fish) var kahi tari asa lihi..majja yeil

Anonymous said...

व्वा सुंदर . मस्त लिहीले आहे.

Unknown said...

ekdam zakkas

Nile said...

mala suddha khupach avadala to .. mahanunach me post kela kahi vakya khupach chan .. "मला बनवता येत नाहीत पण खाता येतात." .. "कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो." etc

Anonymous said...

फार मजेदार तर्हेने लिहिले आहे. आवडले.
पुढच्या निबंधाचा विषय काय आहे? सिनेमा असावा बहुतेक. "तारे जमीन पर " मधल्या इशान अवस्थी ने पेपर सोडविताना अवकाशातील तारे काय झक्कास तोडले होते. प्रसुन जोशी , स्वानंद किरकिरे, अमोल गुप्ते मन्डळि हे पेज नक्की वाचून नंतरच सीन आणि कथा लिहायला बसले होते.
I am sure about it.